जातीवरील आरक्षणास आमचा विरोध आहे. त्यामुळे १००% जागांपैकी २५% (किंवा ५०%) जागा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देण्यास मुळीच हरकत नाही.

सहमत.

आणि असे करतानाही गुणवत्तेलाच प्राधान्य द्यावे असे वाटते.

हा दुटप्पीपणा आहे असे वाटते. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत हे सांगण्यासाठी कोणा अतिबुद्धिमान-अतिप्रज्ञावंत-विचारवंत माणसाची गरज आहे असे वाटत नाही. हे ज्यांना दिसत नाही त्यांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे की काय असा प्रश्न पडतो.