त्यामुळे तुमचे हे वाक्य दिशाभूल करणारे असावे का ??
त्याउलट सरकारी खात्यात/सरकारच्या आधिपत्याखालील कंपन्यात, शाळा, कॉलेजात हे प्रमाण आणि त्याचा फायदा पाहिला जातो का ?
धावण्याच्या शर्यतीत १०० स्पर्धक आणि बक्षिसे फक्त ३ असतात म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी म्हणून बक्षिसांची संख्या वाढवायची का ?
जे लोक 'MBBS' सारख्या परीक्षा पास होऊ शकतात (थोडक्यात ते इतक्या गुणवत्तेचे असताना) त्यांना उच्चशिक्षणासाठी आरक्षणाची काय गरज ?? अशावेळी आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात नाही का ?
शेवटच्या प्रश्नाला पुरवणी-
अश्या आरक्षणातून जागा मिळवून डॉक्टर झालेल्या व्यक्तीने डॉक्टर पेशाशी अजिबात संबंध नसलेली एखादी सरकारी नोकरी आरक्षणातून मिळवणे किती योग्य-अयोग्य आहे? असे प्रकार टाळण्यासाठी आरक्षण घेणाऱ्यांकडून काय उपाय केले जात आहेत?
चर्चेच्या प्रवर्त्याकडून या प्रश्नांच्या उत्तरांची वाट पाहत आहे.