पिण्याचे पाणी, मंदिर प्रवेश,
हे प्रकार कुठे आणि किती होत आहेत ते सांगावे. एखादे उदाहरण देण्याऐवजी गेल्या वर्षभरात इतके-इतके प्रकार घडले असे सांगितले तर बरे होईल. एक उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राचे प्रातिनिधीक असेल असे वाटत नाही.
चोरी साठी एका ठराविक जातीला जबाबदार धरले जाणे,
हे प्रकार कोणाकडून आणि किती होत आहेत. सामान्य लोकांकडून की पोलिसांकडून? एखादे उदाहरण देण्याऐवजी गेल्या वर्षभरात इतके-इतके प्रकार घडले असे सांगितले तर बरे होईल. एक उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राचे प्रातिनिधीक असेल असे वाटत नाही.
तसेच आरक्षण मागणारे आणि देणारे सदर 'ठराविक' जातीचा 'जन्मजात चोर' हा शिक्का पुसण्यासाठी काय करत आहेत? आरक्षण घेऊन शिक्षण घेतलेल्या आणि शिक्षणाचे महत्त्व समजलेल्या लोकांकडून या आणि अश्या जातींना शिक्षणाचे महत्त्व समजावण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जर ५० वर्षांनंतरही असे प्रश्न असतील तर इतर राज्यांची काय स्थिती असेल?
"महाराष्ट्रातली स्थिती इतर राज्यांपेक्षा बरी आहे" असे अनुमान या प्रश्नात दडलेले आहे असे वाटते.