मी ही दोन उदाहरणे देत आहे देश सेवेची. अर्थातच हा माझा वाटा नव्हे. ज्यांचा आहे ते दोघे डॉक्टर मित्र मनोगतावर येत नाहीत (वेळेअभावी)

मी जाहिरातबाजीचा आरोप टाळण्यासाठी नावे देत नाही

१.  देशासाठी काहीतरी करावे या विचाराने एका मित्राने यु. के. सोडून पुण्यात रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. अशी ही आपल्या देशातील, माझ्या माहितीप्रमाणे, पहिली सेवा आहे. आतापर्यंत या सेवेमुळे कित्येकांचे प्राण वाचलेत.

२. लंडन युनिव्हर्सिटी ला काम करण्याची संधी नाकारून दुसरा  मित्र भारतात परत आला. त्याने महाराष्ट्र सरकार कडून संपूर्ण महाराष्ट्रातील अपंग मुलांची यादी मिळवली (अशी यादी अस्तित्वात आहे), त्या यादीतून दृष्टिहीन असलेल्या मुलांची वेगळी यादी केली. या सर्व दृष्टिहीन मुलांची तपासणी करता त्यात जवळ जवळ २००-२१० मुले ट्रीटेबल कॉजेस ने अंध आहे असे निष्पन्न झाले. माझ्या मित्राने व त्याच्या टीमने या मुलांचे मोफत उपचार करून त्यांना त्यांची दृष्टी परत मिळवून दिली

"स्वदेश" हा फक्त सिनेमा नाही.

मनकवडा