हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात पुरुष पार्श्वगायकांमध्ये महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश हे नेहमीच सम्राटपदी राहिले. त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार, मन्नाडे, तलत महमूद, महेंद्र कपूर यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पटले/समजले नाही. आपला पहिल्यादुसऱ्या क्रमांकाचा निकष कळला नाही. केवळ लोकप्रियता ('नंबर्स') हा निकष होऊ नये असे वाटते.
महंमद रफी, किशोरकुमार, मुकेश यांना कमी लेखायचा उद्देश नाही, तेही चांगलेच - नव्हे उत्तमातील - गायक होते याबद्दल वाद नाही, पण तलत हा तलत होता. तो 'क्लास'च वेगळा! आणि वेगळ्या अर्थाने 'क्लास'बद्दल बोलायचे झाले, तर तलत, हेमंतदा, मन्ना डे, महेंद्रकपूर हे आपल्या जागी श्रेष्ठ होते, तर किशोरकुमार, महंमद रफी आणि मुकेश त्यांच्या. त्यांच्यात तुलना होऊ शकत नाही. (एका अमेरिकन म्हणीप्रमाणे 'सफरचंदे आणि संत्री यांची तुलना करता येत नाही'. तुलना ही तुल्यांत, जसे दोन संत्र्यांत किंवा दोन सफरचंदांत होऊ शकते, एक संत्रे आणि एक सफरचंद यांत नाही.)
माझ्यापुरतेच बोलायचे झाल्यास माझ्या लेखी तलत हा नेहमीच सम्राटपदी राहिला आहे.
हेमंतदांचा धीरगंभीर 'बेस' हीच त्यांची मर्यादा ठरली.
अपवाद म्हणून का होईना, 'है अपना दिल तो आवारा' या हेमंतदांच्या गाण्याची विनम्रपणे आठवण करून द्यावीशी वाटते.
मन्नाडे तर फारच कमनशिबी.
सहमत. उत्तम गायकी असूनही फारसे व्यावसायिक यश न मिळाल्याबद्दल मन्नाडे, महेंद्र कपूर यांच्यासाठी खूपच वाईट वाटते.
पण या लेखात मी चर्चा करणार आहे ती तलतच्या फारशा लोकप्रिय नसलेल्या पण तरीही अत्यंत श्रवणीय अशा काही गाण्यांची. प्रथम तलतची काही द्वंद्वगीतं.
लोकप्रियतेबद्दल फारशी कल्पना नाही, त्यामुळे केवळ मला आवडलेली एवढ्या एकाच निकषाच्या आधाराने बोलू शकतो. 'नैन मिले नैन हुए बावरे'बद्दल सहमत. तसेच आपली यादी सर्वसमावेशक नाही किंवा संपूर्णही नाही हेही जाणतो (किंबहुना तसे करणे शक्यही नसावे), परंतु याच यादीत 'आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए', 'इतना न मुझसे तू प्यार बढ़ा' किंवा 'ओ दिलदार बोलो एक बार'चाही समावेश करण्यास हरकत नसावी, असे वाटते. (परंतु कदाचित 'आहा रिमझिम के' हे लोकप्रिय असावे.) 'टिम टिम टिम तारों के दीप जले' पण वाईट नाही. (अशी खूप देता येतील.)
तलतची एकट्यानं गायलेली, फारशी प्रसिद्ध नसलेली पण जीव वेडावून टाकणारी बरीच गाणी आहेत.
या यादीसाठी 'दो दिन की मुहब्बत में हम ने कुछ खोया है, कुछ पाया है' हे गाणे सुचवावेसे वाटते.
एवढी दोनच गाणी वाईट म्हणावी इतकी टाकाऊ वाटतात.
'रुस्तम-सोहराब'मधील 'माज़न्दरन'पण झेपले नाही. (किंबहुना कळलेही नाही - विशेषतः 'टायटल' - पण तो भाग वेगळा.) ऐकून झोप येते.
त्याला स्वतःला बंगाली पार्श्वभूमी असूनही
हे नीटसे कळले नाही. अर्थात तलतच्या पार्श्वभूमीबद्दल कल्पना नाही.
मच ऑफ व्हॉट ही सँग इज प्युअर गोल्ड.
हे मात्र खरे!
सोबतीला ( आपल्या व तलतच्या मध्ये न येणारा / री ) 'तो' किंवा 'ती' असावी
हे तितकेसे पटले नाही. तलतचा आस्वाद हा एकांतातच घ्यायचा प्रकार आहे, असे वाटते. (किंबहुना हा एकांड्या शिलेदाराचाच मार्ग असावा.) तलत 'अनुभवण्या'साठी तलत आणि आपल्यात एक प्रकारचे 'वन-टु-वन कनेक्शन' होणे फार जरुरीचे आहे, असे वाटते. फार तर कोणी आला/लीच सोबत (टाळता आला/ली नाहीच), तर आपल्या आणि तलतच्या मध्ये त्याने/तिने कडमडू नये (घेता आला आस्वाद, तर घ्यावा, नाहीतर गप्प बसावे) ही किमान अपेक्षा! (अशी माणसे विरळा!)
- टग्या.
जाता जाता: तलतची द्वंद्वगीते ही सहसा आनंदी, तर एकट्याने म्हटलेली गीते ही सहसा गंभीर, बरेचदा दुःखमय असतात (अपवाद: 'तुम तो दिल के तार छेड़कर', 'राही मतवाले'), या निरीक्षणाबाबत काय वाटते?