डायनॅमिक फॉंट वापरण्यासाठी ब्राउझर ह्या तात्पुरत्या फायली बनवतो, ब्राऊझर बंद झाला किंवा चालक प्रणाली पुन्हा सुरू झाली की सर्व तात्पुरत्या फायली नष्ट व्हायला हव्यात, परंतु तसे एन टी ४ वर होत नसल्याचे ठाऊक होते.
मात्र काही जणांनी ही समस्या एन् टी ४ प्रमाणे विंडोज २००० (एस पी ४) वरही जाणवलेल्याचे कळवलेले आहे. ह्या प्रणालींवर ब्राउझर बंद करूनच काय पण संगणकही बंद करून पुन्हा चालू केला तरी ह्या फायली नष्ट होत नाहीत. त्या मुद्दाम काढाव्या लागतात. एक्स पी वर ही समस्या अद्याप दिसलेली नाही. बाकी प्रणाली पडताळता आल्या नाहीत.
डायनॅमिक फाँट वापरणाऱ्या कुठल्याही संकेतस्थळाच्या बाबतीत हे होते. ईसकाळ, म.टा आणि डायनॅमिक फाँट वापरणारी मनोगतासारखी इतर अनेक मराठी/अमराठी संकेतस्थळे वापरून ही समस्या जाणवलेली पडताळून पाहिलेली आहे.