असडीक म्हणजे साल न काढलेले (तांदूळ) (वि. सडलेले = वरचे साल काढून पांढरे शुभ्र केलेले) सडीचे तांदूळ आणि असडीचे तांदूळ असे म्हणतात. चू. भू. द्या. घ्या.
गडकऱ्यांचे
"आंबेमोहर काय भाव?" "असडी सत्ताविसाने दिला"
हे गद्य संवादाचे शार्दूलविक्रीडित प्रसिद्धच आहे. (कुणाला माहीत असेल तर चारीही ओळी द्याव्या)
शेवटची ओळ -
"साडे पंच्विस द्या" "हं द्या" "किति कसा?" "पल्ला" "चला, माप घ्या"
'असहकरिता' ही टंकलेखनाची चूक आता सुधारलेली आहे. असहकारितेची चळवळ माहीतच असेल.
तुम्ही बारकाईने पाहात आहात हे चांगले आहे.
धन्यवाद.