कारण भारतात जे शिक्षण पदवी पर्यंत मिळते ते पाहता ज्या लायकीचे शिक्षण उच्च शिक्षणात मिळते ते पदवीपेक्षा निश्चितच चांगल्या दर्जाचे नाही का ?? जर चांगल्या दर्जाचे नसेल तर मग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतकी धडपड आणि बोंबाबोंब का ?? शिक्षणाचा दर्जा चांगला नसतानाही जो तो आपल्याला 'आत कसे घुसता येईल' याच्यामागे का?

म्हणजे सध्या उच्चशिक्षण घेणारे सारे (अर्थातच मुक्त प्रवर्गातील) हे शिक्षण घेण्याच्या लायकीचे आहेत --

सध्या आहेत किंवा नाही यापेक्षा 'असायला हवेत' यावर माझा भर आहे. कारण उच्च शिक्षण आणि त्या उच्च शिक्षणामुळे उपलब्ध होणारी संधी पाहता ती व्यक्ती त्याच लायकीची किंवा जबाबदार असणे गरजेचे आहे. एकंदरीत आयआयटी सारख्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा, त्याचे निकष, तेथील अभ्यासक्रम पाहता कमी गुणवत्तेचे परीक्षार्थी प्रवेश परीक्षेतच आपटतात. शिवाय या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची सवलत नसल्यामुळे निश्चितच चांगल्याच दर्जाचे विद्यार्थी या शिक्षणास पात्र होतात असे आपल्याला वाटत नाही का ??