जयंतराव,
आपले विधान योग्य असावे असे वाटते. बहुधा कविता अजुन मुरली असती तर बरे झाले असते. असो.
कल्पना करा की एक सुमधुर भावगीत किंवा भक्तीगीत कोणी दिडशहाणा गायक गातोय. आपल्या संगीतकौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी मूळ चालीची जेव्हा तो वाट लावतो तेव्हा जे दुःख होते ते यातुन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तो त्रास दर्शवण्यासाठी शस्त्रास्त्रे, डबके अश्या घनघोर उपमा वापरल्या आहेत. याआधी ही कविता मी अनेक लोकांना चालीसहीत ऐकवली तेव्हा त्यांना ती आवडली. प्रत्यक्ष बोलण्यात संदर्भ सहज देता येतो. परंतु, संगणकासारख्या माध्यमात हे नेहेमीच शक्य होत नसल्यात्यामुळे ही कविता एवढी खुलली नसावी. अर्थातच हा मी ह्या कवितेचाच दोष समजतो.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. (हे मी खरोखर मनापासून लिहितोय. कृपया कुठलाही गैरसमज नसावा.)