मनोगतींनो,

हा टोपी खाली दडलेला हिमेश रेश्मिया जादु आहे.
मला मुळातच त्याचे नाकात गाणे आणि ती भिकार दिसणारी टोपी ह्यामुळे त्याचा तिटकारा आहे. पण माझी १७ महीन्याची लेक त्याची जबरदस्त फॅन आहे. कुणालाही खोटे वाटेल पण ती ८ महीन्यांची असल्यापासुन आशिक बनायाचे संगीत सुरु झाले की एकदम excite व्हायची आणि टी व्ही वर गाणे दिसले की उभे राहता येत नसले तरी हात वर करुन नाचत असे. खरे तर ८-९ महिन्यांचा जीवाला काय कळते पण आम्ही थक्क झालो. पुढे पुढे तर ती iTV Video on Demand  वरुन हे गाणे लावल्या शिवाय जेवत नसे. अजुनही ते किंवा त्याचे दुसरे कुठलेही गाणे टी व्ही वर लागले किंवा ऐकायला आले की लगेच हात वर करुन नाचायला लागते.

येथे माझा उद्देश रेश्मियाच्या उदात्तिकरणाचा नसुन परिस्थितीची जाणिव करुन देण्याचा आहे

प्रशांत