आरक्षणावर सध्या चर्चा चालू आहे. मला या निमित्ताने काही प्रश्न विचारावेसे वाटतात.

आरक्षण घेणारे व ते न घेता शिकणारे (open catagory मधील ) अशा दोन्ही वर्गांतील अनेक विद्यार्थी परिक्षेत व संपूर्ण शिक्षणातही गैर मार्गाने जातात. अशा वेळी open catagory मधील विद्यार्थ्याला होणाऱ्या शिक्षेपेक्षा आरक्षण वा सवलती घेणाऱ्या विद्यार्थ्याला होणारी शिक्षा वेगळी वा  जास्त असावी का?

मानसशास्त्र प्रगतीसाठी सवलत व शिक्षा अशा दोन्ही साधनांचा पुरस्कार करते.मग फक्त आरक्षण व सवलतींचीच चर्चा का?

प्रगतीसाठी केवळ आरक्षण हा एकच मार्ग आहे का? माझ्यामते तो एकमेव नव्हे तर अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे. अनेक मोठ्या पदांवरील मागासवर्गीय व्यक्तींची चरित्रे पाहिल्यास त्यांना आरक्षणापेक्षा उच्च वर्गीयांच्या सहवासाचा अधिक फायदा झालेला दिसतो.(एक उदा. म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचे चरित्र सांगता येईल.) हा व असे अन्य मार्ग का शोधले जात नाहीत?

तिसरे म्हणजे चर्चा केवळ आरक्षणाचीच होते. आतापर्यंत दिलेल्या सवलती वा आरक्षणाचा ताळेबंद का मांडला जात नाही ?

मुख्य म्हणजे सरकारला आरक्षण महत्त्वाचे वाटते की मागासवर्गीयांची प्रगती ? साध्यापेक्षा साधनाचीच चर्चा जास्त का?

अवधूत.