इस्लाममध्ये किती दूरवर पोचणारे "क्लोज़्ड-फ़ॉर्म-लॉजिक" आहे ते थोडे सांगू इच्छितो.
मुस्लिमांच्या श्रद्धेप्रमाणे व कुराणात/प्रेषिताने सांगितल्याप्रमाणे -

कुराणातली प्रत्येक ओळ प्रत्यक्ष ईश्वराने प्रकटवलेली आहे.
सांगितलेला धर्म हा (जगातील) सर्व लोकांसाठी व सर्व कालासाठी आहे हे स्पष्ट केलेले आहे.
पूर्वीच्या प्रेषितांनी सांगितलेला धर्मदेखील खरा होता पण तो अपभ्रष्ट केला गेला किंवा झाला, म्हणून सर्व गैरसमज दूर करण्यासाठी येथे स्पष्ट व पूर्ण स्वरूपात तो दिलेला आहे.
शेवटी ईश्वराने हेही सांगितलेले आहे की जे सांगायचे होते ते सगळे सांगून झाले व आता सांगण्यासारखे काहीही उरले नाही.
हे ही सांगितले की मुहम्मदानंतर कोणीही प्रेषित यायचा उरला नाही, येणार नाही.

थोडक्यात आधीच्या सर्व रेघा तशाच ठेवून त्या सर्वांहून लांब अशी एक रेघ काढली आहे की तिच्यानंतर आणखी रेघा काढण्याला मनाई आहे, त्या काढल्या तर त्यांना रेघा म्हणू / मानू नये.
पुस्तक कसा विरोध करणार हा भाबडा विचार झाला. कुराणात ईश्वराच्या आज्ञा, भयसूचना (ही खास इस्लामी शब्दरचना), काय केले पाहिजे व काय करू नये याचे मार्गदर्शन आहे असे वाटते (मग ते आपल्या मते अपूर्ण का असेना).
कुराणातल्या उपदेशामध्ये त्रुटी असल्या (हे अशक्यच असणार)/ (मानवाला)दिसल्या तर त्याची भरपाई करण्यासाठी - त्याबाहेरचा प्रेषिताचा उपदेश, त्याचे स्वतःचे वेळोवेळचे वर्तन आणि इतर तत्कालीन मुस्लिम सत्पुरुषांची वचने व शेवटी धर्मगुरुसभांचे निर्णय आलेच.
विषय अनाकलनीय होण्याइतका किचकट आहे अशी माझी तरी धारणा झाली आहे.
म्हणून वंदे मातरम हे कुठल्याही (किती अतिरेकी शब्दप्रयोग!) धर्मीयांच्या भावना दुखावणारे आहे की नाही हे हिंदूंसारख्या सबगोलंकार व संदिग्ध विचाराच्या लोकांनी न बोललेले बरे.
सर्व धर्म सारखेच (श्रेष्ठ) व सर्व धर्मांची शिकवण एकच आहे व सर्व धर्मांनी गुण्यागोविंदाने एकत्र रहावे असा भोळाभाबडा विचार फक्त हिंदूच करू शकतात.
[वृकोदरांनी दिलेले दुवे पुन्हा एकदा तपशीलवार वाचले तर उरलासुरला गैरसमजही दूर व्हायला मदत होईल]
पण हे सर्व असूनही मी इस्लामवर सरसकट टीका करू इच्छित नाही. त्यातही एक प्रकारचे आकर्षण आहे, एक नितांत शुद्धता आहे, समता आहे हे निश्चित. पैगंबरांचे जीवनचरित्रदेखील मनावर प्रभाव पाडणारे आहे याची साक्ष मी देतो.