अगदी खरे आहे ! माझ्या भाच्याला - समीरला, अदनान सामीचे 'मुझकोभी तो लिफ्ट करा दे' हे गाणं खूप आवडायचं. आम्हीही व्हिडिओ ऑन डिमांड मध्ये त्याच्यासाठी हे गाणं लावलं जावं यासाठी प्रयत्न करायचो. बाबा आले की सगळे चॅनल बंद आणि बातम्यांचंच चॅनल चालू, असा घरात अलिखित नियम असूनही हे गाणं चालू असेल तर ते संपल्याशिवाय चॅनल बदलायचं नाही असा नविन नियम बनला होता ! दादाने तर नंतर त्याला ते गाणं असलेली सीडीच आणून दिली होती. सीडी आल्यावर मग त्याला माहिती झालं की पाहिजे तितक्या वेळेस ऐकता येईल, मग हालायचाच पत्ता नाही डीव्हीडीसमोरून. "माईआत्या, काय सुंदर चिमणी आली आहे बघ बागेत !" असं म्हणून मी बाहेर बागेकडे पळाले की श्री माझ्या मागे यायची. माझ्याच फॅन असलेल्या या दोघी अचानक कुणासाठी बाहेर गेल्या हे बघण्याच्या कुतुहलापोटी समीरपण बागेत यायचा आणि मग वेगवेगळ्या खेळात रमायचा. असेच पैतरे वापरुन हळूहळू या गाण्याचं भूत कमी करवलं त्याचं. पण एक मात्र अगदी खरं आहे.. आजही हे गाणं लागलं की स्वारी जाम खुश असते समीरची ! :D ती सीडी अगदी जीव की प्राण आहे त्याची.