महेशरावांचे आणि मनोगताचे अभिनंदन मायबोलीच्या प्रशासकांनी करावे असा मणिकांचनयोग आज आलेला दिसत आहे.
मायबोली, दिशा आणि मनोगत हे मराठीसाठी महाजालावर वृत्तफलक (बुलेटिनबोर्ड) तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांवरील मैलाचे दगड आहेत. ही संकेतस्थळे तयार करून, निरंतर अभंग राखून आणि मायबोलीच्या लेकरांना महाजालावर प्रच्छन्न वापरासाठी व्यासपीठे उपलब्ध करून देऊन, मराठीच्या अर्वाचिन प्रगतीची जी मुहूर्तमेढ आपण रोविली आहेत तिला दुसरी उपमा नाही. आपणा उभयतांचे हार्दिक अभिनंदन. आणि आपल्या तसेच मराठीच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आमच्यातील सूप्त साहित्यिकांना जागृत करण्याचे महान कार्य आपण केलेले आहेत. त्याखातर शतशः धन्यवाद.