मला वाटते अशाने, "आरक्षण" या विषयासाठी किमान ३०% जागा मनोगतावर राखुन ठेवायला हवीय.. :) :)

मलाही असेच वाटते. शेवटी हा सत्ताधाऱ्यांचा खेळ आहे. मतपेटीवर डोळा ठेवून केलेले राजकारण आहे. हा विषय मनोगतापूरता तरी आता संपवावा. तेच तेच वाचून कंटाळा आलाय. इतक्या चर्चा करूनही सगळ्यांची मते जर प्रत्येक चर्चेत ठामच असतील, कुणाच्याही भूमिकेत कसलाही फरक होणार नसेल तर मला तरी ही चर्चा दोन्ही बाजूंनी प्रचारकी होत आहेसे वाटते. काही ठराविक मंडळी आपापले घोडे पुढे दामटण्यासाठी या चर्चांचा गैरवापर करत आहेत असे वाटते. अन्यथा पहिल्या एक-दोन चर्चांतच कुणाला काय वाटते हे स्पष्ट झाले आहे. परत परत तेच वाचण्यात काय अर्थ आहे. प्रशासकांनीच या विनाकारण वाढलेल्या चर्चा आता बंद कराव्यात.

                                                                       साती काळे