मा. प्रशांत,
आपणच लिहिलेत, की "परिस्थितीची जाणिव"...
म्हणजे आपणास नक्की काय म्हणायचे ते समजेल का?
मला, ईथे वेगळीच परिस्थिती दिसतेय.
"आपणास कोणी सांगितले?" या माझ्या प्रतिसादात "अवास्तव प्रसिध्दी" बद्दल लिहिलेच आहे.
खरच परिस्थिती वेगळी आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे ना...
दिवसभरात, १५-२० चॅनेल्सवर जर हीच गाणी हज्जार वेळा प्रक्षेपीत होत असतील तर काय होणार ? साहजिकच आहे की तेच माणसाच्या डोक्यात बसणार.
दुसरे असे की आपणच लिहिले, "खरे तर ८-९ महिन्यांचा जीवाला काय कळते पण आम्ही थक्क झालो."
बरोबर आहे, त्याला नाही कळत पण ... आपल्याला?
माझ्या पुतण्याची गोष्ट सांगतो ...
तो आता ९ महीण्याचा आहे. कितीही रडत असेल, तर फ़क्त "राम नामाचा जप"
जगजीत सिंग ची "हे राम" असे भजन ची कॅसेट आहे. ती लावली किंवा त्या चालीत आपण म्हटले तरी तो एकदम शांत होतो. आणि आनंदाने हसु लागतो.
(अतिशयोक्ती नाही. हे अगदी खरे आहे. पडताळूनही पहाता येवु शकेल)
मग सांगा, आपण जे सारखे बघतो/ऐकतो (टी व्ही वर) त्याचा परिणाम होतोच की नाही.
अनेक वाहिन्या सारखा या गाण्यांचा मारा करीत असतात. आणि आपण म्हणतो हा हीट तो हीट , याची फ़ॅन त्याची फ़ॅन... काय अर्थ आहे याला?
आपला,
--सचिन