अभिजित,

बरं लक्षात आलं तुमच्यामुळे. मलाही करायचे आहे नेत्रदान ( आईचा पाठींबा आहे, पण बाबांचा नाही. घरातल्या इतरांसमोर तर अजून 'ने' सुद्धा उच्चारला नाहीये ! ) नेत्रदानाबद्दलची पूर्ण माहिती कुठे मिळू शकेल? अर्जात कोणकोणत्या बाबींची चौकशी/मागणी केली जाते? जवळच्या नातेवाईकांकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र वगैरे काही लागतं का? ( लागत असेल तर बोंबलाबोंबलच होईल घरी ! नसेल लागत तर आईला सांगून परस्पर नेत्रदान करून मोकळं होता येईल आणि मागाहून फक्त घरी सांगितलं की झालं. ) संबंधित संस्थेचा संपर्कासाठीचा पत्ता वगैरे काही सांगू शकाल का? दोन्हीही डोळे दान करावे लागतात का की कुठला दान करायचा हे ठरवता येते?