चर्चा, स्वतः काय केले करतो या विषयी आहे याची जाणिव आहे.
मी स्वतः अजुन तरी असे काहीच केले नाही. करायची ईच्छा आहे.
(थोडे से आमच्या समाजातिल लोकांसाठी करतो. जसे गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थीक मदत. यापेक्षा जास्ती काही नाही.)
परंतु मनकवडा यांनी लिहिले म्हणुन मलाही इथे मझ्या मित्राचे हे कार्य सांगावेसे वाटले.
माझे मित्र, मुरली कृष्णमूर्ति ...
गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहत आहेत. परंतु, भारतात ते नियमीत येतात.
शिवाय, अमेरिकेत त्यांचे ईतर सहकारी मिळुन काही चॅरिटी शो करतात. स्वकमाईतूनही काही हिसा एकत्र करुन भारतात, "संकरा नेत्रालय" चेन्नई इथे उभारले आहे.
शिवाय, हैद्राबाद, गुजरात येथेही त्याच्या शाखा उभारत आहेत.
आपला,
--सचिन