अनुताई,
चांगला विषय चर्चेस घेतला आहात. भाषा दर दहाकोसांवर बदलते असे म्हणतात. त्यामुळे हिंदीला गुजराती, गुजरातीला मराठी, मराठीला तेलुगु आणि तेलुगुला तमिळ जवळची भाषा आहे. पण एकदम तमिळ माणसाने हिंदी भाषा पाहिल्यास त्या दोन भाषांत त्याला थोडा अधिक फरक जाणवणे साहिजिकच आहे.
आमच्या पाहण्यात असे आले की हिंदी भाषेविषयी कन्नडा, तेलुगु आणि मलयाळम लोकांची मानसिकता तितकीशी वाईट नाही. ब्रिटिशांनी शिकवलेला चुकीचा इतिहास, भाषेचे राजकारण आणि तमिळ लोकांमधे असलेला उपजत सर्वंकष दुराभिमान ह्यामुळे काही तमिळ भाषिकांना हिंदीविषयी तिटकारा निर्माण झाला आहे. हे होऊ नये म्हणून राजाजींसारख्या दूरदर्शी नेत्यांनी तेथे राष्ट्रभाषा सभेच्या माध्यमातून उत्तम हिंदी शिक्षण सुरू केले होते. आजही पद्धतशीर हिंदी शिक्षण घेतलेला तमिळ सामान्य मराठी माणसापेक्षा हिंदीमध्ये अधिक तरबेज असतो परंतु बोलायची संधी न मिळाल्याने त्याचे ज्ञान गंजून जाते असे वाटते.
आपला
(सर्वभाषाप्रेमी) प्रवासी