केलेले चांगले कार्य आणि दान हे करायचे आणि आपण हे केले या समाधानात विसरून जायचे. ते गायचे कशाला? यापेक्षा काय करत येईल ते पाहायला हवे. जे आपण केले असेल ते केले असे न म्हणता 'हे करून पाहावे/ हे सहज शक्य आहे' असे सांगीतले तर उत्तम.
कोण काय करते हे पाहण्या पेक्षा, काय प्रत्यक्षात करता येऊ शकते, कसे करावे लागते ही माहिती मिळवणे हा या चर्चेचा उद्देश आहे असे वाटते. किमानपक्षी आपण काहीच करत नाही जी जाणीव जरी मनाला झाली तरी ही चर्चा सफल होईल. असे करावे तसे करावे म्हणताना आपण खुद्द काहीच प्रतिसाद देऊ शकत नाही ही बोचणी काही मनोगतींना तरी प्रेरणा देणारी ठरेल अशी आशा आहे.
अर्थात जो सुचवेल त्याने ते केलेले असले पाहिजे वा करावे असे बंधनकारक नाही.
मान्य. स्वतः कोरडे पाषाण असलो तरी (ही जाणीव ठेवत) दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्यास काहीच हरकत नाही. असे तो नेहमीच करतो. हे असे ज्ञान घेणाऱ्याचे तरी काहीच नुकसान होणारे नाही.