ए.आर.रहमान, सुनिधी चौहान, सोनु निगम, सुखविंदर सिंग, हिमेश रेशमिया,अजित कडकडे वगैरेंसारखे कलाकार तितके दिग्गज नसतील जितके या गीतसंगीताच्या दुनियेत बालगंधर्व, कुमार गंधर्व, आण्णा, जितेंद्र अभिषेकी, लताआशा, रफी वगैरे होते/आहेत/असतील, पण याचा अर्थ असा नाही की त्यांची कलाकृती कोणाला आवडूच नये, किंवा आवडली म्हणजे त्यांना दुसऱ्या यादीत नमूद केलेल्या कोणाचीच कलाकृती आवडत नसणार किंवा त्यांची गहराई कळली नसणार. माझ्या मते असे विभाजन करताच येऊ शकत नाही

एकतर मला या वाक्याचा अर्थच कळाला नाही. पण एकंदरीत या लिखाणाचा मतितार्थ पहाता चांगले आणि वाईट अशी काही विभागणीच करता येणार नाही, असा लेखिकेचा सूर दिसतो.

हे लेखिके, तुला कोपरापासून हात जोडून वंदन असो!

मी बाकी माझ्या एका अस्थिरोगतज्ञ मित्राला त्याच्या रुग्णांच्या पायदुखीसाठी दिल विच हलचल कर गई.. अखियोंसे गल कर गई.. ! या गाण्याचा वापर करायला सांगणार आहे!

सन्जोप राव