अभिजित,
कृपया माझे शब्द लक्षात घ्या<<केलेले चांगले कार्य आणि दान हे करायचे आणि आपण हे केले या समाधानात विसरून जायचे. ते गायचे कशाला?>>
चांगल्या कार्याची माहिती अवश्य द्यावी, पण ती दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची; स्वतः केलेल्या नव्हे. जगात अनेक असामान्य लोक आहेत ज्यांनी त्यांच्या सामाजिक/ राष्ट्रिय ध्येयाप्रत सर्वस्व वाहीलेले आहे. ते कधीच आपली महती गात नाहीत. मग आपल्या हातून काही चांगले होते असेल तर त्याचा गाजावाजा कशाला? मग 'समाजसेवा' करताना झकपक कपड्यात आपली छबी छापून आणणारे, 'अमुक एक रस्ता तमुक एक साहेबांच्या प्रयत्नाने झाला' वगरे पाट्या आपल्या बगलबच्च्यांकरवी लावून घेणारे व आपण यांत फरक काय?