खरंच खुप झाले..
मी काय तुमच्या घरचा नोकर नाही, की तुमच्या व्यक्तिगत साहीत्यासाठी तुमच्याकडुनपैसेही घेत नाही. सन्जोप साहेबांनी सुचवलेल्या विषयावर कोणीच लिखाण करणार नाही. मि निवडलेला विषय चुकीचा असेलही, पण तो दैनंदिन दिवसांत सर्वांच्यासमोर कधीही, कुठेही घडत असतो, त्याला विनोदाचीही झालर आहे.
तुम्हाला प्रतिसाद देणे बंधनकारक नाही, नसेल आवडला तर सोडुन द्या, नाहीतर सरळ साध्याशब्दात आवडले नाही हे सुध्दा सांगता येते. प्रतिभा, लेखनशैली वगैरे शब्द वापरणाऱ्यांनी स्वतः कडे आधी बघावे.
आणि कोण तो मला शक्तिवान शब्दात (म्हणजे शिव्याच का?) देण्याची भाषा करतोय? माझा aniket.com@gmail.com हा इमेल आय-डी आहे, जरा कळवा तर तुम्हाला काय म्हणायचे ते, मग माझ्याकडचे ही शक्तिवान शब्द तुम्हाला कळवीन.
असो, माझे येथील वास्तव्य मी स्वतःच संपवत आहे.
जाण्यापुर्वी, विसोबा खेचर (तात्या), अनु, वेदश्री, शशांक, भोमेकाका, निलहंस, एक वात्रट, वेदश्री, माधव कुलकर्णी, मी राधीका, सुखदा, माफिचा साक्षीदार
या सर्व मनोगतींचा निरोप घेतो. तुम्हा सर्वांकडुन खुप काही शिकायला मिळाले.
तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल, सल्यांबद्द्ल, आणि "सौम्य" शब्दात समज दिल्याबद्दल आपले आभार..
माझ्याकडुन हा अखेरचा निरोप.
धन्यवाद
आपला
अनिकेत, उर्फ अनिकेतसमुद्र, उर्फ तात्या विंचु.