भोमेकाकांच्या विचारांशी एकदम सहमत.
परिचयोत्तर विवाह ही संकल्पना आता बरीच रुढ होऊ लागली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी तर काही संस्था अशी संधी तरुण-तरुणींना उपलब्ध करुन देत आहेत.
मी सुद्धा योग्य जोडीदार शोधत असल्यामुळे पुण्यात अशा एक संस्थेशी सलग्न आहे जिथे परस्पर संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध आहे. या संस्थेमधे सुरुवातच स्व-ओळख करण्यापासून होते. त्यानंतर जोडीदाराची डोळस निवड, परिचयोत्तर विवाहाची संधी आणि समृद्ध, समाधानी सहजीवनाची समज यासाठी मनमोकळ्या गप्पा, चर्चा, सहली, खेळ, प्रसंगनाट्य, प्रश्नावली, मान्यवरांशी चर्चा, शिबिरं, कार्यशाळा, पुस्तकभिषी इ. उपक्रम राबवले जातात. यातूनच इतर सभासदांचे स्वभाव कळण्यास मदत होते की जेणेकरुन योग्य साथीदार निवडता यावा.
आता तुमचा प्रश्न येईल की बाबा रे, तुला साथीदार मिळाला की नाही?
उत्तरः अजून नाही.
पण या संस्थेत जाऊन एक फायदा मात्र झाला. महाविद्यालयानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील खुप मित्र-मैत्रिणी मिळाले. सगळ्याच मुली जोडीदार होऊ शकत नाहीत, पण छान मैत्रिणी तर होऊ शकतात!
आता मी जोडीदार होऊ शकेल अशा मुलीच्या शोधात आहे....!!!