सन्जोप राव,

आपल्या मते नक्की चांगले काय आणि वाईट काय कळू शकले तर बरे होईल.

मी बाकी माझ्या एका अस्थिरोगतज्ञ मित्राला त्याच्या रुग्णांच्या पायदुखीसाठी दिल विच हलचल कर गई.. अखियोंसे गल कर गई.. ! या गाण्याचा वापर करायला सांगणार आहे!

नक्कीच सांगा. माझ्याप्रमाणेच जर त्यांच्या रुग्णांपैकी कोणाला छान ताल असलेल्या गाण्यांवर नाचायला मनापासून आवडत असेल तर नक्कीच गुण येणार, यात मला तिळमात्र शंका नाही.

गीतरामायणाबद्दल एक अनुभव सांगतात की यातलं 'दैवजात दुःखे भरता..' गाणे ऐकताना बऱ्याच वर्षापासून अंथरुणाला खिळलेली व्यक्ती उठून बसण्याइतपत तल्लीन झाली होती ! ही गोष्ट ऐकूनदेखिल आपण असाच टर उडवण्याच्या शैलीचा वापर करून प्रतिसाद देण्याचा पवित्रा घेतला असतात का?