मा. अनिकेत,
अहो रागवू नका...
पटले तर बघा... मी तुमचे संकेत स्थळ बघितले आहे, तिथे जे लिहिले ते वाचलेही. खूप छान लिहिता/संकलन करता.
शिवाय आपण एस . क्यू .ए. झालत तेही कळले. त्यावरून अनुमान, तुम्ही क्यु ए इंजिनीयर आहात.
आहो तुम्ही नाही का 'बग्ज' काढत, डेव्हलपरच्या सॉफ़्टवेअर मधले...
तसेच समजा, तुमच्या लिखानातला हा एक बग होता(?)...इतर मनोगतिंना
(क्यू ए ना) तो सापडला किंवा वाटला. त्यांनी तो तुम्हाला कळवला.
ते सुधारण्याची तुमची तयारी आहे. बस्स !झाले की मग...
आहो घरात नाही का भांडणे/वाद होत...म्हणुन काय कोणी घर सोडुन जाते का लगेच?
मला कळतेय की हे सांगणे सोपे, पण प्रत्यक्षात अवघड...तरिही ...
हुश्श !!! फ़ारच डोस झाले फ़िलॉसॉफ़ीचे...
थांबताय का मग?
आपला,
---सचिन