सुंदर, प्रवाही लेख. शापित म्हणणार नाही...बेसुमार गाणी गाऊन लोकांना त्रास देणाऱ्यांपेक्षा (यात रफी, किशोर वगैरेंची गणना नाही) मोजकीच पण सुरेल आणि श्रवणीय गाणी गाणारा तलत कधीही उजवाच.
काही महिन्यांपूर्वी शिकागोला खास जुन्या गाण्यांच्या CDs घेण्यासाठी गेलो होतो. दुकानात गर्दीही होती. मी तलतच्या CDs ची मागणी केली तशी एक उत्तर भारतीय मध्यमवयीन बाई (दुसऱ्या खरेदीदार) माझ्याजवळ आल्या आणि विचारु लागल्या, "इथे कोण तलतचा फॅन आहे?" मी हसले तशा म्हणाल्या, "तलतचे शौकीन तरुण मंडळीत कमीच आढळतात. तुम्हाला तलत आवडतो हे ऐकून खूप बरं वाटल. माझे वडिल त्यांचे जवळचे मित्र होते. मी त्यांची गाणी समोर अगदी ८-१० फूटांवर बसून ऐकली आहेत. अर्थात ही जुनी गोष्ट झाली पण अजूनही त्यांचा स्वर्गिय आवाज कानात खेळतो."
मग आमच्यात जुन्या गाण्यांवरुन संभाषण झालं, बाईंची कळी एवढी खुलली होती की त्यांनी नंतर मला बऱ्याच जुन्या CDs विकत घ्यायला मदत केली.
तुमच्या लेखाने आठवण जागी झाली.