जात पात विसरा काही क्षणापुरती. पण हे असे गैरमार्गाने नालायक विद्यार्थी शिक्षणसंस्थात प्रवेश करतात हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना त्यामुळे गुणवंतांवर अन्याय होत आहे, यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, कॉपी बंद व्हावी, पेपर फुटी बंद व्हावी, शिकवण्याची साठगाठ बंद व्हावी म्हणून या विरुद्ध गुणवंतांनी केलेली निदर्शने आपल्या पाहण्यात आहेत?
ही देखील करायला काय हरकत आहे? याने गुणवंतांवर अन्याय होत नाही?
सहमत. होतो निश्चितच अन्याय होतो आणि अशी निदर्शनेही करु.
अहो, पण प्रकरण "प्रवेश करतात" वरच अडकले आहे. जेंव्हा सर्वचजण गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश घेतील तेंव्हाच पुढचे प्रश्न हाताळले जातील असे वाटत नाही का? की दोन-दोन आघाड्या उघडून दोन्हीकडे तोंडाला पाने पुसून घ्यायची?
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत. त्या पुरे झाल्या की मग तो इतर गोष्टी जसे शिक्षण, आराम, संपत्ती वगैरे कडे माणूस वळतो. त्या पुऱ्या झाल्या की मग आणखी गोष्टी जसे सत्ता, इतर हक्क आणि सर्वात शेवटी अध्यात्म वगैरे कडे वळतो. असे मांडणारी एक थिअरी आहे (नाव आठवत नाही) असे वाटते.
(याचाच गैरफायदा उठवून देशातल्या राजकारण्यांनी देशातील बहुतांशी जनतेला झुलवत आणि गंजत ठेवले आहे असे वाटत नाही का? ५०% हून अधिक जनता अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या चक्रातच अडकलेली आहे!)
तसेच या बाबतीतही आहे असे वाटते. आधी प्रवेशतरी सर्वांना समान गुणवत्तेने द्या मग पुढे इतर अन्यायांकडे वळू.
("शिकवण्याची साठगाठ" हे प्रकरण समजले नाही. जरा समजावून सांगा.)