आपल्या लहानपणापासून आपणा सर्वांच्या मनात ठसलेले हे गीत, पण त्याचा अर्थ संपूर्ण गीत म्हणून सरळ लागत नाही हे मात्र खरे. 
माझा अन्वय असा -
ही एक प्रेमभाव व्यक्त करणारी जरा उत्तानशृंगारपूर्ण ग़ज़ल वाटते.
सर्व कडवी/शेर प्रियकराने प्रेयसीस उद्देशून लिहिल्यापैकी वाटतात.
तशी काही शास्त्रशुद्ध नियमावर उतरणारी नव्हे, पण ग़ज़ल म्हणण्याचे कारण इतकेच की कडवी एकमेकांशी घट्ट संबंध नसणारी, शेरांसारखी सुटी-सुटी वाटतात. एकाचा दुसऱ्याला मेळ बसतोच असे नाही.
त्यांना एकत्र बांधणारे सूत्र म्हणजे रात्र, चांदणे, मेघ, इ. संबद्ध वस्तूंचा उपमा/रूपक म्हणून केलेला वापर हे असावे.

आता इतर मित्र काय म्हणतात ते पाहूया.