छान आहे! ;-)
पहिल्या कडव्यात 'भांडताना'ऐवजी 'बोलताना' म्हटले असते, तर आणखीही मजा आली असती. (भांडताना काय हो, कोणीही वाकडे बोलेल! ही सुंदरी साधे बोलतानासुद्धा वाकडे बोलते. [केल्या कवितेवर फुकटचे सल्ले द्यायला माझे हो काय जातेय? :-) ])
'डांबरी रस्ते' आवडले!
'उंबरी पुष्प' कल्पना खूपच सुंदर आहे, पण विडंबनात्मक वाटत नाही. (किंबहुना विडंबनासाठी नको तितकी सुंदर वाटते - मजा येते, पण विडंबनाचा 'झटका' येत नाही.) पर्यायी शब्दरचना काय चालली असती याबद्दल विचारमग्न. (विडंबन तुमचे आहे; ते कसे लिहावे यात लुडबूड करणारा मी हो कोण? "टग्या, लेका, काय ती विडंबनाची मजा घ्यायची ती घे आणि गप्प बस की! आणि तुला तरी दुसरा शब्द सुचतोय का तिथे? [आख्खी कविता करायचे तर सोडूनच दे!] पण नाही. जित्याची खोड! उचलले बोट, लावले कीबोर्डला!")
एकंदरीत आवडली.
- टग्या.