१. आरक्षण व परीक्षेतील गैरप्रकार यातील जी गोष्ट निर्विवाद अन्यायकारक आहे ती म्हणजे गैरप्रकार. (नावातच गैर!)

२. आरक्षणाचे फायदेतोटे तपासायची गरज व्यक्त होते तर अशा गैरप्रकारांचे तोटे तपासण्याची तत्वतः गरज दिसत नाही.

३. (विवादास्पद) आरक्षणे विधायकात अडकली, जून २००७ मध्ये येणारी तर गैरप्रकास रोजचेच.

४. आरक्षणावर मतभेद, चर्चेची गरज तर गैरप्रकारांविरुद्ध एकवाक्यता.

या बाबी आपले प्राधान्य ठरवायला मदत करू शकतील अशी आशा करतो.

की आरक्षणे ५० वर्षापुर्वीची म्हणून परंपरा बाह्य व गैरप्रकार परंपरेचा भाग?

(विषयांतर करण्याचा बेत नाही पण प्राधान्य 'गुणवत्तेलाच' हेच या मागचे सुत्र आहे हे चाचपण्याचा बेत आहे. हलवून खुंटा बळकट होतो म्हणतात.)

बाकी मास्लो म्हणाल तर सरकारने उच्चशिक्षणा सारखे 'सेल्फ ऍक्च्युअलायज़ेशन' चे ध्येय ठेवण्यापेक्षा अन्न, वस्त्र, निवारा कडे लक्ष देणेच योग्य ठरेल.

"गुणवंतांना गुण प्रकट करण्याची संधी देणे" व "मागासांना पुढे येण्याची संधी देणे" यात प्राधान्य कशाला असावे?

शिकवण्यांची साठगाठ चा निर्देश आय आय टी मध्ये आधीच चाललेल्या कोटाराज्या कडे आहे. (ही कोटी नव्हे!)

अधिक माहिती सवडीने.