श्री. जीएस,

आपले लिखाण खरेच स्फूर्तिदायक आहे. गिरिभ्रमण वर्णनाची आपली हातोटीही वाखाणण्याजोगी आहे. वाचताना प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा भास होतो.
एवढ्या दुर्गम वाटेने किल्ल्यावर पोहोचल्यावर प्रत्यक्ष किल्ल्याचे वर्णन अपेक्षित होते. पण लगेचच परतीच्या प्रवासाचे वर्णन सुरू झाल्याने किंचित हिरमोड झाला.

या आणि एकूण सगळ्याच गिरिभ्रमण लेखांतील स्थानिक गावकऱ्यांचे अगत्य पाहून छानच वाटले. केव्हाही, न सांगता, टपकणाऱ्या शहरी 'डोंगरप्रेमींना' मदत करणाऱ्या त्या साध्या माणसांचे कौतुक.

मृदुलाच्या वरील प्रतिसादाशी १०० टक्के सहमत.