हो वाटते आणि तसे विचारतो सुद्धा!
सरकार काही करत नाही हे तर दिसते आहेच. स्वार्थी, मूर्ख आणि नादान नेत्यांचा भरणा सरकारात आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
हो ना? मग आरक्षणाचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध अशा नालायक सरकारने यावेळी मात्र जागरुकता दाखवावी (आरक्षितांना जाब विचारताना) कशी हा प्रश्न पडला (इतरांनी विषय काढला म्हणून) इतकेच.
सगळ्याच गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहायचे ठरवले तर आज 'मनोगत'सुद्धा उपलब्ध झाले नसते असे वाटते.
अर्थात काही बाबतीतील सरकारवचे अबलंबन (अवलंबिता, अवलंबित्व ??? अरेरे काय हे शब्दच आठवेना..) न टाळता येण्याजोगे आहे हे उघड आहे.
सरकार ते निवडणाऱ्या जनतेइतकेच नालायक/कुचकामी इत्यादी इत्यादी असते इत्यादी इत्यादी..