'राही मतवाले' हे द्वंदगीत आहे (सुरैया -वारिस)
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
नक्की आठवत नाही, परत एकदा ऐकून खात्री करून घेऊन नक्की सांगेन, पण या गाण्यात सुरैयाचा भाग केवळ (विशेषतः ध्रु(व?)पदात) 'आवाजात आवाज मिसळून गाणे' एवढाच नाही का? नाही म्हणजे, संपूर्ण गाणे (स्मरणशक्तीप्रमाणे) मनातल्या मनात एकदा गाऊन पाहिले, पण त्यात सुरैयाचे स्वतंत्र कडवे असे आठवले नाही. नक्की खात्री करून घेईनच! (हे म्हणजे थोडेसे 'प्यार पर बस तो नहीं है' सारखे आहे. म्हटले तर द्वंद्वगीत आहे, म्हटले तर नाही! आशा[? चूभूद्याघ्या!]चा भाग फक्त कडव्यांच्या अधूनमधून हुंकारणे [याहून समर्पक शब्द सापडला नाही!] एवढ्यापुरताच मर्यादित आहे.) कदाचित यामुळेच मी चुकून ते 'सोलो'मध्ये गणले असावे. तत्त्वतः ते द्वंद्वगीत आहे, हे मान्य!
ठीक आहे, पण मग तलतच्या अपवादात्मक 'सोलो, तरीही आनंदी/आशावादी' गाण्यांच्या यादीमध्ये 'राही मतवाले'ऐवजी पुढील पर्यायी गाणी घालायला हरकत नाही. (वरील चर्चेवरून आठवली.)
१. है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं (हो, हे आशावादी मानायला हरकत नाही. विशेषतः यातील
जब ग़म का अंधेरा घिर आए, समझो के सवेरा दूर नहीं
हर रात का है पैग़ाम यही, तारे भी यही दोहराते हैं।
आणि
पहलू में पराये दर्द बसाके हँसना-हँसाना सीख जरा
तूफ़ान से कह दे घिरके उठे, हम प्यार के दीप जलाते हैं।
ही कडवी.)
२. ये हवा, ये रात, ये चाँदनी तेरी एक अदा पे निसार हैं
३. झूमे रे, नीला अंबर झूमे धरती को चूमे रे
सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे 'बेचैन नजर बेताब जिगर' हेसुद्धा या यादीत गणता यावे.
- टग्या