सन्जोपराव,
मला संगीतातलं फार कळत नाही आणि जुन्या गाण्यांची माहितीही नाही. पण तलत मेहमूद ही विलक्षण जदुई अशी चीज आहे हे मात्र मला पक्कं ठाऊक आहे. तुमचे सगळे शब्द किती खरे आहेत.(मद्याचा शषक सोडून..)
तलतचा आवाज म्हणजे मखमली फुंकर आहे. काळजाला झालेली मुलायम अशी जखम आहे. मला तुमच्यासारखं अधिकारवाणीने लिहिता येणार नाही पण हे वाचताना खूप छान वाटलं. शिरीष कणेकरांनी तलतवर लिहिलेला असाच एक नितांतसुंदर लेख मी एकदा वाचला होता. तेव्हाही असंच खूप छान वाटलं होतं.
तुमच्याकडून तलतबद्दल अजून काही ऐकायला आवडेल मला. तुम्ही उल्लेख केलेली बरीचशी गाणी मी ऐकलेली नाहीत. मी मेरी याद मे तुम ना आसू बहाना, तस्वीर बनाता हू तसवीर नही बनती, मेरा करार ले जा, अंधे जहान के अंधे रास्ते, जाये तो जाये कहा,चल दिया कारवा, रातने क्या क्या ख्वाब दिखाये, बेचैन नजर बेताब जिगर, तुम तो दिल के तार छेडकर, ये हवा ये रात ये चांदनी, जलते है जिसके लिये, इतना ना मुझ से तू प्यार बढा अशी काही मोजकी गाणी ऐकली आहेत. पण या गाण्यांनी मला तलतचं वेड नक्कीच लावलं आहे. त्यातही सीने मे सुलगते है अरमआँ आणि नैन मिले नैन हुए बावरे ही मला विशेष आवडतात.... तुम्ही मला काय ऐकावं हे सांगू शकाल का?
इतका सुंदर लेख इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद....
(भारावलेली )अदिती