नक्की आठवत नाही, परत एकदा ऐकून खात्री करून घेऊन नक्की सांगेन, पण या गाण्यात सुरैयाचा भाग केवळ (विशेषतः ध्रु(व?)पदात) 'आवाजात आवाज मिसळून गाणे' एवढाच नाही का? नाही म्हणजे, संपूर्ण गाणे (स्मरणशक्तीप्रमाणे) मनातल्या मनात एकदा गाऊन पाहिले, पण त्यात सुरैयाचे स्वतंत्र कडवे असे आठवले नाही.
आताच म्युझीक इंडीयावर हे गाणे ऐकले. यात सुरैयाचे स्वतंत्र कडवे असे नाही. या गाण्यावरुन एक आठवण आली. १९९९ साली पार्ल्यात अनिल बिश्वास यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक कार्यक्रम झाला. त्यातील सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर गाणी गायली. एकाने "राही मतवाले" (तलत-सुरैया) दोघांच्या आवाजात गायले.