ते गायचे कशाला?

सर्वसाक्षी, तुमचा मुद्दा पटेल, परंतु या चर्चेच्या संबंधात नाही. (तुम्ही म्हणता तशा अर्थाचे मतप्रदर्शन विजय तेंडुलकरांनी २००३ सालच्या बृ.म.मं. च्या सभेत विस्तृतपणे केले होते. त्यात इतरही काही वादग्रस्त उल्लेख होते. ते संपूर्ण भाषण माझ्याजवळ आहे. वेळ मिळाला तर चढवीन - पण वेगळ्या चर्चेद्वारे. असो. आठवण झाली म्हणून उल्लेख. या चर्चेत पुन्हा यावरून वाद नको.) याचर्चेचा उद्देशच मुळी इतरांच्या कामातून थोडीफार प्रेरणा घेण्याचा आहे. आणि तो  म्हणतात त्याप्रमाणेः

किमानपक्षी आपण काहीच करत नाही जी जाणीव जरी मनाला झाली तरी ही चर्चा सफल होईल. असे करावे तसे करावे म्हणताना आपण खुद्द
काहीच प्रतिसाद देऊ शकत नाही ही बोचणी काही मनोगतींना तरी प्रेरणा देणारी ठरेल अशी आशा आहे.

... हेही खरेच. किंबहुना अशा जाणिवेपोटीच ही चर्चा सुरू केली आहे.

आतापर्यंत आलेल्या सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अजूनही प्रतिसाद येवोत अशी इच्छा आहे. "स्वदेश" सारखी वरील उदाहरणे तर दोन्ही हातांनी "घे" म्हणत आहेत. आपलीच (माझीच) झोळी फाटकी आहे अजून.

- कोंबडी

जाता जाताः त्याचे सर्व उल्लेख फारच गोंधळात टाकतात कधीकधी. त्यामुळे त्याचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करावा अशी त्याला विनंती.