कुठलेच पुस्तक तत्वज्ञान संपूर्ण आहे असे मानणे तो चुकीचेच समजतो. (कुठलेच बरोबर नाही असा याचा अर्थ काढणेही अर्थात तितकेच चुकीचे.)

देवाने लिहीलेले पुस्तक इत्यादीचे (कुठल्याच धर्मासाठी) समर्थन करणे त्याला जमेल/पटेल असे वाटत नाही.

धर्मीयांच्या भावना दुखावणारे आहे की नाही हे हिंदूंसारख्या सबगोलंकार व संदिग्ध विचाराच्या लोकांनी न बोललेले बरे.

वर्षानुवर्षे विचारसरणीवर झालेले संस्कार काही मर्यादा ही घेऊन येतात हे खरे आहे. एकूणच (वंदे मातरम प्रकरणीच नव्हे) आम्हाला जमते, त्यांना का नाही हा प्रश्न प्रत्येक बाबतीत (मानवी हक्कांची पायमल्ली शी संबंधीत विषय सोडून) विचारला जाणे अनावश्यक वाटते.

सर्व धर्म सारखेच (श्रेष्ठ) व सर्व धर्मांची शिकवण एकच आहे व सर्व धर्मांनी गुण्यागोविंदाने एकत्र रहावे असा भोळाभाबडा विचार फक्त हिंदूच करू शकतात.

मान्य. हिंदूंनी तो तसा करावा हेच हिंदूत्वाचे मूळ आहे असे वाटते. हे भाबडे पण हरवल्यास हिंदू देखील आणखी एक धर्म बनावयास अडकाठीच उरणार नाही.

वृकोदरांनी दिलेल्या दुव्यातील दुसऱ्या दुव्यामधील संकेतस्थळाचे पहिले पान पाहिल्यास हे संकेतस्थळ का बनवले आहे हे समजण्यास वेळ लागणार नाही. विरोधकांनी लावलेल्या अर्थांचा मूळ संकल्पनेत समावेश करण्यास तो खचितच कचरतो. समर्थकांनी (म्हणजे अल-कायदा नव्हे हो!) लावलेले अर्थ वाचायला आवडतील.

त्यातही एक प्रकारचे आकर्षण आहे, एक नितांत शुद्धता आहे, समता आहे हे निश्चित. पैगंबरांचे जीवनचरित्रदेखील मनावर प्रभाव पाडणारे आहे याची साक्ष मी देतो.

त्याचा अर्थातच याही विषयावर अभ्यास नाही. माहिती बद्दल धन्यवाद.