तुम्ही मला काय ऐकावं हे सांगू शकाल का?

(प्रश्न सन्जोपरावांना आहे हे मला माहीत आहे, पण तरीही इथे मी उत्तर दिले तर मला वाटते तो आगाऊपणा ठरू नये.)

कदाचित (बहुधा!) आपण ही गाणी ऐकली असतील, पण ही आणखी काही तलतची ऐकलीच पाहिजेत अशी गाणी आहेत. (याव्यतिरिक्त वरील चर्चेतही ऐकलीच पाहिजेत अशा बऱ्याच गाण्यांचा उल्लेख झालेला आहे, त्यांची पुनरावृत्ती या यादीत कटाक्षाने टाळली आहे.)

१. शाम-ए-ग़म की क़सम
२. फिर वही शाम
३. मैं दिल हूँ एक अरमान भरा
४. मैं तेरी नजर का सुरूर हूँ
५. मुहब्बत ही न जो समझे वो ज़ालिम प्यार क्या जाने*
६. ज़िन्दगी देनेवाले सुन
७. मैं पागल, मेरा मनवा पागल, पागल मेरी प्रीत रे
८. अश्कों में जो पाया है
९. देख ली तेरी ख़ुदाई
१०. सब कुछ लुटाके होश मे आए
११. अपनी नाक़ामी से मुझको काम है
१२. फिर मुझे दीदा-ए-तर याद आया
१३. कभी हैं ग़म, कभी ख़ुशियाँ, यही तो ज़िन्दगानी है
१४. हम से आया न गया
१५. आँखों में मस्ती शराबकी
१६. जब छाए कभी सावन की घटा
१७. जली जो शाख़-ए-चमन (एक मैं हूँ, एक मेरी बेखुदी की शाम है)

'ऐ मेरे दिल कहीं ओर चल'सुद्धा अत्यंत श्रवणीय आहे, परंतु व्यक्तिशः मी ते तलतच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी मानत नाही. वाईट आहे म्हणून नाही (वाईट नाहीच!), पण तलतच्या इतर गाण्यांपुढे अगदीच 'रन-ऑफ-द-मिल' वाटते म्हणून!

यांव्यतिरिक्त 'आए भी अकेला, जाए भी अकेला', 'मेरा जीवनसाथी बिछड़ गया', 'कोई नहीं मेरा इस दुनिया में, आशियाँ बरबाद है' वगैरे ठीकठीक आहेत.

- टग्या.

* या गाण्यावरून उर्दूत 'मुहब्बत' आणि 'प्यार' यांच्यामध्ये अर्थच्छटेचा फरक असावा, अशी शंका उत्पन्न झाली आहे. तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.