गारदी मारावयास अंगावर आले असता नारायणरावाने जिवाच्या आकांताने ठोकलेल्या प्रसिद्ध आरोळीचा उर्वरित (अप्रसिद्ध) भाग:

'वाचवा, काका, वाचवा!' (म्हणजे, 'अहो काका, नुसते बघत काय उभे राहिलाय, मला वाचवा की!' अशा अर्थाने.)
'वाचवा हो वाचवा!'
(यावर राघोबादादांनी 'वाचवा? का वाचवा???' आणि त्यानंतर 'का वाचवा??? का??????' असे नारायणरावास प्रतिप्रश्न केल्याचे अनधिकृतरीत्या समजते.)

(कदाचित '"काका, वाचवा"??? का??? का??????' असेही असू शकेल.)