प्रवासी आणि मृदुला ह्यांनी मनोगत नेमके जाणले आहे.
खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर 'आमची माती आमची माणसं' असा एक कार्यक्रम असे. हे शीर्षक दाद देण्यासारखे आहे. (हा कार्यक्रम शेतीविषयक असल्याने आम्ही गमतीने त्याला 'आमची पोती आमची कणसं' असेही म्हणत असू.) तर ही शब्दयोजना मनात होतीच.
पुढे ह्या संकेतस्थळाला नांव सुचवताना कौंतेय देशपांडे ह्या सदस्याने 'आपली मानसं' हा शब्दप्रयोग सुचवल्यावर हे सारे एकत्र करून ते येथे सुयोग्य पद्धतीने वापरावे असे वाटले. त्याच्यतून 'मराठी माती मराठी माणसं मराठी मती मराठी मानसं' असा तळवा सुचला. प्रवासी ह्यांनी सांगितलेला वाच्यार्थ, आणि मृदुला ह्यानी सांगितलेला ईप्सितार्थ - दोन्ही योग्य आहेत.