मला वाटते, तीच तर खरी गंमत आहे! त्यामुळे चालू द्यावे.

(ज्युलियस सीझरला अशीच स्वतःचा उल्लेख तृतीयपुरुषी एकवचनी करण्याची सवय होती म्हणतात.)
('ऍस्टेरिक्स'प्रेमींना कदाचित 'मॅन्शन्स ऑफ द गॉड्स'मधील हा प्रसंग आठवत असेल. 'त्या' खेड्यातल्या (कधीही पराभूत न होणाऱ्या) गॉलमंडळींकडून आपल्या सैन्याला सदैव खाव्या लागणाऱ्या माराला वैतागून ज्युलियस त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची योजना आखतो. बहुधा 'त्या' खेड्याच्या आजूबाजूचे सर्व जंगल तोडून तेथे गृहसंकुल बांधून तेथे रोमन लोकांची वस्ती वसवायची, जेणेकरून एक तर जंगल गेल्याने गॉलमंडळींच्या उपजीविकेचे साधन राहील, शिवाय इतक्या प्रचंड रोमनवस्तीपुढे ते काही करू शकणार नाहीत / आयसोलेट होतील, अशी काहीशी ती योजना असते. ज्युलियस ही कल्पना (बहुधा सिनेटमधल्या) प्रतिष्ठित रोमनांना समजावून सांगत असतो (प्रेझेंटेशन देत असतो) - अर्थात तृतीयपुरुष एकवचनात! नेहमीप्रमाणे एक स्तुतिपाठक संधी साधून ज्युलियसला 'चढवू' बघतो. त्यांचा संवाद पुढीलप्रमाणे:

स्तु.पा.: तो ग्रेट आहे!
ज्यु.सी.: कोण?
स्तु.पा.: अं... तुम्ही!
ज्यु.सी.: अच्छा, तो होय!

या संवादाची या संदर्भात आठवण झाली.)