चांगला प्रश्न आहे.
इश्क म्हणजे अतीव ओढ. (एक्सेसिव्ह पॅशन)
चाह - म्हणजे ओढ, आवड, प्रेम, निवड
इखलास - म्हणजे (स्वत्व विसरून केलेली पूजा, शुद्ध प्रेम, सात्विकता)
मुहब्बत - प्रेम, मैत्री
प्यार म्हणजे साधे सुधे प्रेम असावे (हे काय म्हणून विचारल्यास त्यालाही सांगता येणार नाही.)
यातून फक्त 'प्यार' आणि 'मुहब्बत' यांच्यातील फरक कळला नाही. असो.
"ज्याला 'मुहब्बत'सुद्धा कळली नाही, त्याला 'प्यार' काय कळणार" यावरून 'प्यार' हा साधासुधा प्रकार नसून, 'मुहब्बत' त्याहूनही साधीसुधी असावी, असे मात्र वाटते. या बाबतीत आपल्याला काळे अक्षर म्हशीसमान!
तज्ज्ञ खुलासा करतील, अशी अपेक्षा करू या. नाहीतर मामला कठीण आहे.
- टग्या.