पहिल्या दुव्यावर शोधाशोध केली असता उर्दूत 'प्यार' हा 'पियार'चा पाठभेद असल्याचे समजते. 'मुहब्बत' आणि 'प्यार/पियार'चे अर्थ शोधले असता, पुढीलप्रमाणे मिळतात.

मुहब्बत: लव्ह, अफेक्शन, फ्रेंडशिप.
पियार, प्यार: लव्ह, अफेक्शन, फाँडनेस, अटॅचमेंट, फ्रेंडशिप.

दुसऱ्या दुव्यावरही थोड्याफार फरकाने असेच काहीसे निष्पन्न होते.

अच्छा, म्हणजे 'प्यार'मध्ये 'फाँडनेस' आणि 'अटॅचमेंट'चे 'व्हॅल्यू-ऍडिशन' होते तर! (म्हणजे साधे प्रेम विरुद्ध उत्कट प्रेम, वगैरे? त्या अनुषंगाने संपूर्ण गाण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय, सीम्स टू मेक सेन्स, अर्थ लागतोय असे वाटतेय, पण खात्री नाही. [आणि शब्दशः अर्थ लागलासा वाटला, तरी रोख कळत नाही.])

(पहा अर्थ लागतोय का:

मुहब्बत ही न जो समझे, वो ज़ालिम प्यार क्या जाने
निकलती दिल के तारों से जो है झंकार, क्या जाने

उसे तो कत्ल करना और तड़पाना ही आता है
ग़ला किस का कटा क्यूँ कर कटा, तलवार क्या जाने

दवा से फ़ायदा होगा, के होगा ज़हर-ए-क़ातिल से
मरज़ की क्या दवा है ये कोई बीमार क्या जाने

करो फ़रियाद, सर टकराओ, अपनी जान दे डालो
धड़कते (?) दिल की हालत हुस्न की दीवार क्या जाने

अर्थ लागल्यास जरूर कळवा.)

- टग्या.