आरक्षणासंदर्भात करण थापर यानी अर्जुनसिंग यांच्या घेतलेल्या मुलाखतीवरून आपण आरक्षणातील प्रमाण कसे ठरवले याविषयी माननीय मन्त्रीमहोदयाना एकाही प्रश्नाचे योग्य उत्तर देता आले नाही असे दिसते. आरक्षण असावे की नसावे या वादात मी पडू इच्छित नाही पण हे बिल संसदेत ओ.बी‌‌. सी  च्या कळवळ्याने नाही तर केवळ राजकीय फ़ायद्याच्या हेतूने आणण्यात आले आहे आणि सर्वच पक्ष राजकीय फ़ायद्याच्या मागे असल्याने कोणीच त्यास विरोध करत नाही  अथवा करू शकत नाही येवढे मात्र निश्चित !