मी 'खारीचा वाटा' असा दावा करण्याइतकं तरी काही देशासाठी करते का?प्रश्न पडला.
मला फक्त आठवणारी काही कामेः(ही देशासाठी आहेत का हा मुद्दा ज्याच्यात्याच्यावर आहे.)
१. कुठल्याही मोठ्या वस्तूचे, दागिन्याचे बिल घेताना आग्रहपूर्वक पक्के बिल घेऊन देशाला टॅक्स मिळवून देते.
२. कचरा वर्गीकरण,प्लॅस्टीक पिशव्या वापर यावर कितीही चेष्टा झाली तरी डोस देत असते. बाहेर असताना केलेला कचरा कचराकुंडी जवळ नसली तर कागदात गुंडाळून आपल्या पिशवीत ठेऊन घरी आल्यावर टाकते.
नेत्रदान करण्याची इच्छा आहे. पण मध्यंतरी रॉबिन कूकची 'ब्लाइंडसाइट' कादंबरी वाचून 'असंही घडू शकतं' म्हणून विचार जरा लांबणीवर टाकला.