त्याच्या प्रत्येक गोष्टीला 'मिस' करण्याची थोडी टर उडवण्याची इच्छा होते आहे खरंतर. तुला सांगु का तो इथे असताना तर त्याने 'तिथल्या' गोष्टींना 'मिस' केलं असतं. त्याला ना ‍'मिस करण्याचा मेनिया' झालायं. जसं आनंदी रहाणं हा 'मनोभाव ( अॅटिट्‍यूडला नक्की हेच म्हणावं काय?) असतो तसं त्याचा एखादी गोष्ट सतत 'मिस' करत रहाण्याचा मनोभाव झालायं.