आपण असे आणखी कोणते वाद आहेत असे विचारले होते. बघूया आणखी कोणते वाद सापडतात तेः
या वादांमध्ये दोन वेगळे विषय आहेत, सरकार कसे चालवावे व अर्थकारण कसे चालवावे. आता आपण आणखी एक वाद पाहू. पुन्हा वेळ मिळाला की आणखी एखादा.
भांडवलवाद
भांडवलवादामध्ये असे अपेक्षीत आहे की उत्पादनांची साधने ही खाजगी मालकीची असतील व अर्थातच या साधनांचे मालक (व्यक्ती किंवा मंडळी) नफा मिळवण्यासाठी उत्पादन करतील.त्यामुळे कोणत्या वस्तूचे उत्पादन काय प्रमाणात व्हावे हे बाजारच ठरवेल. असेही अपेक्षीत आहे की ही पद्धत सरकारच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय निव्वळ मागणी व पुरवठ्याच्या अर्थशास्त्रीय नियमांप्रमाणे बरोबर काम करेल.
अशा पद्धतीत सर्व उत्पादने, सेवा, व श्रम या सर्वांची अदलाबदल देखील खुल्या बाजारात पैशांच्या साहाय्याने केली जाईल व या सर्वांसाठी असलेली स्पर्धा योग्य ते भाव आपोआप ठरवेल. पैशाच्या गुंतवणुकीचे निर्णय खाजगी स्तरावर केले जातील व सर्व गोष्टींचे वाटप खाजगी मार्गाने पैशासाठी होईल.
या पद्धतीत सामाजिक समानता, संपत्तीचे समान वाटप इत्यादी कल्पना अजिबात अपेक्षीत नाहीत. किंबहुना असे वाटप नसल्यानेच ही पद्धत नीट चलू शकते.
अर्थातच असा शुद्ध भांडवलवाद जवळजवळ कोठेच लागू नाही. सर्वच ठिकाणी सरकारला बऱ्याच ताकदी असतात व बरीच कामे करावी लागतात.
आपला (भांडवलशहा) इहलोकी.