आदिती, लेख वाचला नि प्रामाणिकपणे सांगतो, आवडला नाही.

लेख विस्कळीत आहे. याची मध्यवर्ती संकल्पना किंवा हा लेख का लिहिला गेला हे समजतच नाही आणि त्यामुळे का कोण जाणे लेखाच्या शेवटी वाचकाला आपली फसवणूक झाल्यासारखी वाटते.

प्रत्यक्ष बोलताना किंवा चिठ्ठ्याचपाट्या लिहिताना समोरचा माणूस कुठे आहे किंवा खरा कोण आहे याने तसा काहीच फरक पडत नाही. माणसांच्या जगात त्याला वाटणारा एकटेपणा तो तुमच्याशी बोलून जरा कमी करत असतो एवढंच.
हे छान, अगदी मनातलं लिहिलंस.

आमच्या गप्पा बरेचदा याच विषयावर येऊन थांबतात.
या वाक्यापर्यंत हा लेख 'एक पत्रमित्र नि परदेशात राहून तो 'मिस' करत असलेल्या गोष्टी, त्याला होणारी देशाची नि इतर अनेक गोष्टींची आठवण' या विषयावर बोलतो. पण अचानक आलेल्या तुझ्या"मी ना... मी आयुष्य मिस करतेय."  या वाक्याने जबरदस्त धक्का बसतो. (मला तरी बसला! एखादा बॉम्ब टाकल्यासारखंच वाटतं म्हण ना !)
नंतर येणाऱ्या
त्या क्षणी या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या असणार. बोललेले न बोललेले सगळे संदर्भ त्याला लागले असणार. खात्री आहे मला तशी.
या वाक्यांचा अर्थ तर मुळीच लागत नाही.

पण यापेक्षा निराळं असं काहीतरी तिथे उभं ठाकलं होतं. क्षणभरच.. जास्त नाही... पुढच्या क्षणी तो क्षण भूतकाळात गेला होता. पण तो एक क्षण पूर्ण क्षण ठरला होता.
     माझ्या एकाच वाक्यात मी आजपर्यंत त्याने मला ऐकवलेलं सगळं त्याला परत केलं होतं.... तो क्षण निघून गेला तरी अजूनही माझ्यासमोर तसाच आहे. आणि शेवटपर्यंत तो तसाच राहणार आहे.त्या क्षणी नक्की काय घडून गेलं माहीत नाही पण आम्हा दोघांनाही एकदम काहीतरी जाणवलं. ते काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न मी करणार नाही. पण आयुष्याचे श्वास भरलेल्या वाळूच्या घड्याळातल्या खाली पडून गेलेल्या क्षणांपैकी एक कायमचा लक्षात राहणारा तो एक क्षण होता एवढं मात्र नक्की.
या क्षणात असं वेगळं काय होतं नि तो तुझ्या आयुष्यात घडून गेलेल्या क्षणांपैकी एक कायमचा लक्षात राहणारा क्षण का होता याचं स्पष्टीकरण लेखाच्या शेवटी आवश्यक होतं. पण असं होत नाही नि लेख संपतो. हे स्पष्टीकरण आवश्यक होतं असं तुला वाटत नाही काय?

असो. हे माझे मत आहे,मनात आलं ते लिहिलं. (राग मानणार नाहीस याची खात्री आहे!) पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

कलोअ,
एक वात्रट