मी मतदान करत नाही, कारण मला माझे मत मिळवण्याच्या उंचीचे कार्य एकही उमेदवार करत असल्यासारखे वाटत नाही.

कोणीही १००% बरोबर असतेच असे नाही.

सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशाच घडणे हे ही दुर्लभ. दुसऱ्याने आपल्याला हवे तसे वागणे/कार्य करणे ई. ई. हे तर अजुनच दुर्लभ.

आपण मत न देवुन काय साधतो/काय गमावतो?

न दिल्यामुळे आपल्याला, देशातील ज्या गोष्टी घडतात / जे राजकारण घडते त्यावर बोलण्याचा अधिकार राहत नाही असे वाटते. कारण आपल्याला जो अधिकार आहे तो सुध्दा आपण व्यवस्थित पार पाडत नाही.

आपण मत दिले त्या उमेदवाराला तुम्ही किमान बोलु शकता, की मी/आम्ही तुला मत दिले, तु निवडुन आलास, आता आमच्यासाठी हे हे काम करायला हवे.

(फ़ारच "आयडियल" गोष्ट लिहितो...पण एक शक्यता...कारण आम्ही आमच्या गावत असे केले होते...आणि आश्चर्य म्हणजे डांबरी रस्ता आणि बस सेवा उपलब्ध झाली होती ः), पुणे येथे नऱ्हे गाव... सध्या मी तिथे राहात नाही नुकताच नविन जागी स्थलांतरीत झालोय. )

दुसरे असे, की आपण एक मत वाया घालवतो. समजा २ व्यक्ती उमेदवार असतील तर आपण त्यातल्या त्यात किमान चांगले काम करणारा निवडु शकतो. आपले एक मत नक्कीच फ़रक पाडू शकते. 

१००% अचुकतेच्या आशेत आपण बाकिचे ९९.९९ % ही गमावतो असे नाही का वाटत?

घरात काहीच भाजी नाही. आपण शेजारच्या भाजीच्या दुकानात गेलो, तो म्हणतो आज भाजी आली नाही, कालचे जे आहे तेवढेच समोर आहे , बघा हवे तर...

नाईलाज म्हणुन मग आपण "त्यातल्या त्यात जे बरे" वाटते ते घेउन येतोच ना?

(कधीतरी नक्किच असे केले असणार...) 

(किंवा दगडापेक्षा विट मऊ ..असेही ः))

तसेच काहीसे हे आहे.

"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी " असे कसे चालेल या ठिकाणी !?

आपल्या सारखे सुशिक्षीत असे मतदान न करता जातात, आणि उमेदवार आडाणी लोक हाताला धरून (त्यांची मते घेउन) निवडून येतात. त्यांचे काम होते.

जर आपण आपले कर्तव्य केले आणि आपण ज्याला "किमान बरा" म्हणुन मत दिले तो निवडुन आला तर नक्कीच थोडतरी फ़रक पडु शकतो ...

(हलकेच घ्या हो, पण मग आपण मत न दिल्याने पुन्हा असेच अनेक अर्जुन सिंग येतिल नी आपण मात्र  मनोगतावर  "आरक्षण "...आणि अशाच अनेक गोष्टींवरती नुसत्या चर्चा करत बसु ;-))

------------------

बाकी आपण तक्रार वगैरे बद्दल लिहिले ते आपण "मत देवुन" झाल्यावरही

करू शकतोच की...

असो,

--सचिन